Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : मानसिक तणावातून युवकाचे भयानक कृत्य; सकाळी उठताच कुटुंबिय हादरले

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावात असलेल्या युवकाने भयानक कृत्य केल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या (Buldhana) सुमारास खोलीत गेल्यानंतर धारधार चाकू गेल्यावर फिरवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Khangaon) खामगाव शहरात समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील;खामगाव शहरातील अनिकट रोड भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आकाश प्रमोद खाकरे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे; आकाशने काल रात्री दरम्यान राहत्या खोलीत चाकुने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबियांनी त्याची खोली उघडली असता ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ (Police) उडाली आहे.

खामगाव शहरातील अनिकेट भागातील आकाश प्रमोद खाकरे हा युवक मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. रूममध्ये जाऊन धारदार चाकूने गळ्यावर वार केला. यात रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी मृतकचे काका अजय खाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. खाकरे कुटुंबिय अनिकट रोड भागात अरविंद सरोदे यांच्या घरात भाड्याने राहतात. आकाश याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT