Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Buldhana news : लोणार पोलीस स्टेशनवर धडक देत पोलिसांकडे गावातील अवैध दारू आणि अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली.

संजय जाधव

बुलढाणा : गावात सर्रासपणे दारू विक्रीस अवैध धंदे सुरु आहेत. अनेकदा मागणी करून देखील अवैध धंदे बंद होत नसल्याने आज संतप्त महिलांनी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला. या ठिकाणी गावात दारूबंदी करावी तसेच सुरु असलेले अवैध धंदे देखील बंद करण्याची मागणी केली आई.

बुलढाणाच्या (Buldhana) लोणार तालुक्यातील गोत्रा गावातील शेकडो महिलांनी शिवसेना नेते गोपाल बाच्चिरे यांच्या नेतृत्वात लोणार पोलीस स्टेशनवर धडक देत पोलिसांकडे गावातील अवैध दारू आणि अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. (Liquor Ban) तसेच संपूर्ण लोणार तालुक्यात अवैध दारू विक्री आणि अवैध धंदे सुरू असल्याने अनेकांचे घरे उद्ध्वस्त झाली असून कुटुंब रस्त्यावर आले. तर लहान मुलांना देखील याची सवय लागत असल्याने ते वाईट मार्गाने जात आहेत. 

दारू विक्री बंद काण्याबाबत अनेकदा मागणी केल्यानंतर कारवाई झाली नव्हती. यामुळे गोत्रा गावासह तालुक्यातील अवैध दारू विक्री आणि अवैध धंदे बंद करण्याची मागणी करत महिलांनी पोलिसांना यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी महिलांनी धडक देत पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी देखील केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: 'तू महाराष्ट्राचा बिहार केलास…'; गौतमी पाटीलवर संतापला मराठी अभिनेता, म्हणाला -'तुझे काळे धंदे…'

Maharashtra Live News Update: राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा - शरद पवार

Cough syrup : 'कफ सिरप'मुळे १४ मुलांचा मृत्यू, नागपूरमधील विक्री थांबवली

Mumbai Crime: '₹५०० दे अन् खोलीत चल...' जळगावचा व्यापारी मुंबईत हनी ट्रॅपमध्ये अडकला, मुलींनी असं काही केले की...

Pune Porsche Case : पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अग्रवाल कुटुंब पुन्हा चर्चेत, सील केलेलं हॉटेल पुन्हा मिळालं

SCROLL FOR NEXT