Buldhana News
Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला पकडत सोडले अभयारण्यात

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्याचा भौगोलिक वातावरण अस्वलासाठी पोषक असल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या उतरादा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका अस्वलाला बुलढाणा (Buldhana) वन विभागाच्या रेस्क्यू टीमने केमिकल (बेशुद्ध करून) रेस्क्यू करत अंबाबरवा अभयारण्यात सोडले आहे. (buldhana news wearing bear caught and released in the sanctuary)

चिखली (Chikhali) तालुक्यातील व बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या उतरादा परिसरात चार दिवसा अगोदर एका शेतकऱ्यावर (Farmer) अस्वलाने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले होते. तसेच या परिसरात या अस्वलाने धुमाकूळ घातला होता. बुलढाणा आरएफओ पडोळ यांना माहिती मिळाली, की अस्वल दिवठाणा परिसरात ठाण मांडून बसलेला आहे. याची माहिती बुलढाणा डीएफओ अक्षय गजभिये तसेच एसीएफ रंजीत गायकवाड यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाची (Forest Department) रेस्क्यू टीमला सदर ठिकाणी पोहोचण्याचे निर्देश दिले.

वडनाला परिसरात सोडले

रेसक्यु टीम सर्व साहित्यासह घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष नर जातीच्या अस्वलाला ट्रेंक्युलाईज करून बेशुद्ध करण्यात आले. त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. पशु वैद्यकीय अधिकारी यांनी अस्वलाची प्राथमीक तपासणी करून सुदृढ असल्याचे सागितल्याने बुलढाणा डीएफओ अक्षय गजभिये यांच्या आदेशाने या अस्वलाला बुलडाणा जिल्ह्यातील अंबाबारवा अभयरण्यातील चुणखडी वडनाला परिसरात सुखरूप सोडण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus News: लवकरच तिकीट दरवाढ! बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांना महत्त्वाची बातमी

Eknath Khadse News | प्रवेश लांबला तरी खडसेंकडून भाजपचा प्रचार सुरू, मतदान वाढवण्यासाठी दिला मंत्र

Ravindra Waikar News | उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी...

Baba Ramdev : बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; प्रसिद्ध माफीनाम्यावर समाधान व्यक्त

Health Tips: उन्हाळ्यात आईस्क्रिम ऐवजी खा श्रीखंड; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT