न्याहळोद (धुळे) : धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे पिसाळलेल्या वानरांचा उन्माद सुरू असून बालके व ग्रामस्थांना जखमी केले आहे. वन विभागाने (Forest Department) वानरांच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (dhule news Terror spread by monkeys in the village Many took the bite)
न्याहळोद तसेच परिसरात (Dhule News) गेल्या चार– पाच वर्षापासून वास्तव्य करीत असलेले वानर आता ग्रामस्थांना मनस्ताप ठरत आहे. गावातील सीताराम रोहिदास कढरे हे गच्चीवर झोपले असतांना वानराने (Monkey) त्यांच्यावर हल्ला करीत जखमी केले. तर पिंटू धनगर कोळी यांना देखील जबर जखमी केले असून त्यांना शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांचे पुतणे सुनील कढरे यांनी दिली आहे.
हल्ल्यानंतर वन विभाग दाखल
दरम्यान सकाळीही काही ग्रामस्थांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थ त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत अंगावर धावून येत असल्याचा प्रकार होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विकास पवार यांनी वन खात्यास माहिती दिली. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी पहाणी करून पंचनामा केला. दरम्यान या वानरांची वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.