Dhule: एक कोटी ३० लाखाचा गुटखा जप्त

एक कोटी ३० लाखाचा गुटखा जप्त
Dhule News Updates, Gutka seized in Dhule
Dhule News Updates, Gutka seized in Dhule Saam tv
Published On

धुळे : राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा भरून मुंबईत विक्रीसाठी जाणारे चार कंटेनर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पुरमेपाडा (ता.धुळे) गावाजवळ पकडले. या कारवाईत पथकाने तब्बल एक कोटी ३० लाख रुपये किमतीचा गुटखा (Dhule News) जप्त केला. गुरख्यासह वाहने व मोबाईल असा एकूण जप्त मुद्देमाल तब्बल एक कोटी ९० लाखावर आहे. (dhule news Gutka worth Rs one crore 30 lakh seized)

Dhule News Updates, Gutka seized in Dhule
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; जळगावात छापा टाकत कारवाई

महाराष्ट्रात (Maharashtra) प्रतिबंधित असलेला गुटखा भरून चार कंटेनर (एनएल- ०१/ एसी- ८०९७, एचआर-५५/ एई- ३१७७, एचआर- ३८/ डब्ल्यू- ३२८३, एचआर- ३८/ वाय-९६४०) दिल्ली येथून धुळे जिल्ह्यातील हेंद्रुण-मोघण, मालेगावमार्गे मुंबई (Mumbai) शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी कंटेनरचा शोध घेण्याचे आदेश पथकाला दिले. आर्वी गावाच्या पुढे पुरमेपाडा गावाजवळ संबंधित चारही कंटेनर एका मागे एक जात असल्याचे दिसल्याने पथकाने चारही कंटेनर थांबवून वाहनचालकांचे नाव, गाव विचारले. साबीर माजिद खान (रा. ग्राम घासेरा ता. जि.नुहू, हरीयाणा, शकील अहमद लियाकत अली (रा. ग्राम भडंगाका, ता.जि. नुहू), रुकमोद्यीन अयुब खान (रा. ग्राम हिरवाडी, ता. फिरोजपुर झिरका, जि.नुहू), मुरसलिम रुजदार (रा. ग्राम सोमकी, ता. नगर, जि. भरतपुर), नसिम खान अली मोहम्मद खान ( रा. ग्राम अलिगड गुंडवास, ता. जि. पलवल) अशी त्यांनी आपले नाव, पत्ता सांगितले. (Dhule News Updates)

उडवाउडवीचे उत्‍तरे

कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस करता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे कंटेनरसह त्यांना मोहाडी नगर पोलीस (Police) ठाणेच्या आवारात आणले. कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा मिळून आला. याप्रकरणी गौतम सपकाळे यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. बुधवंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, रफिक पठाण, श्री. सपकाळे, राहुल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कैलास महाजन, संजय सुरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जप्त केलेला मुद्देमाल असा

- ४१ स्टार व ५१ सुगंधित पानमसाला तंबाखू....१,३०,४९,२८०

- चार कंटेनर........................................ ६०,००,०००

- पाच मोबाईल............................................२५,०००

- एकूण...................................... १,९०,७४,२८० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com