Malkapur News Saam tv
महाराष्ट्र

Malkapur News : मलकापूरमध्ये २० दिवसांनी होतो पाणी पुरवठा; राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

buldhana News : मलकापूर शहरात मागील काळात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मलकापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते

संजय जाधव

बुलढाणा : मलकापूर शहरात सध्या २० दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच शहरात स्वच्छतेचे तीनतेरा झाले आहेत. आता पावसाळा सुरु झाला असून जास्त पाऊस झाल्यास घाणीमुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या सर्व गोष्टींमुळे राष्ट्रवादीतर्फे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत निवेदन देण्यात आले. 

मलकापूर (Malkapur) शहरात मागील काळात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मलकापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान शहराला पाणी पुरवठा २० दिवसानंतर केला जात आहे. पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे. तसेच शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. नाल्या तुडुंब भरल्या आहेत, साफसफाई बंद आहे. 

यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात मलकापूर नगरपालिका अपयशी ठरली आहे. या नगरपालिकेच्या गलथान कारभारा विरोधात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात आला. तसेच याबाबत निवेदन देण्यात आले. जर येत्या तीन दिवसात सर्व सुविधा नागरिकांना पुरविल्या गेल्या नाहीत; तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT