Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : अवैध रेती माफियांचा धुमाकूळ, समृद्धी महामार्गावरील १४ ठिकाणी क्रश बॅरियर तोडले

Buldhana News : महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी राज्य सरकारने विविध उपाय योजना राबविल्या होत्या. त्या बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरल्या आहेत. मात्र या महामार्गावर भीषण असे अपघात झाले

संजय जाधव

बुलढाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील राज्यातील महत्त्वाकाक्षी महामार्ग म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते मुंबई असा ७०१ किमीचा हा महामार्ग असून राज्यातील सुरक्षित असा महामार्ग म्हणून समजला जातो. मात्र आता हा महामार्ग असुरक्षित होऊ पाहत आहे. कारण महामार्गावर १४ ठिकाणी क्रश बॅरिअर तोडून अनधिकृतपणे प्रवेश केला जात आहे. यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातून ८७ किमी जातो. समृद्धी महामार्गांवरील वाहतूक कमी वेळात पोहोचण्याचा मार्ग असे वैशिष्ठ आहे. या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी राज्य सरकारने विविध उपाय योजना राबविल्या होत्या. त्या बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरल्या आहेत. मात्र या महामार्गावर भीषण असे अपघात झाले असून यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे शापीत समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला आता वेगळेच ग्रहण लागले असल्याचे दिसून आले आहे. 

१४ ठिकाणी महामार्गावर अनधिकृत प्रवेश  

दरम्यान या मार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी झाले असले तरी व सरकारच्यावतीने सांगण्यात आले की आता अपघात होणारच नाही व सुरक्षित असा हा मार्ग. असे दावे करण्यात आले. तरी ते दावे फोल ठरत चालले आहेत.  त्याला कारणही तसंच आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ८७ किमी समृद्धी महामार्गांवर १४ ठिकाणी रस्त्याचे क्रश बॅरियर तोडून अनधिकृत प्रवेश तयार करण्यात आले आहेत. या अनधिकृत मार्गावरून समृद्धीवर प्रवेश करीत सुसाट वाहने धावताना दिसत आहेत. यामुळे हा समृद्धी महामार्ग सूरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे


वाळू माफियांनी केला रस्ता 
जिल्ह्यातील सर्वात मोठी खडकपूर्णा नदी ही देऊळगावराजा, सिंदखेडराजा या भागातून वाहते. याच नदीतून रेती माफीया सर्रास अवैध वाळू उपसा करीत आहे. ती वाळू ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी या समृद्धी महामार्गाचा उपयोग केला जात आहे. वास्तविक पाहता समृद्धी महामार्गांवर चढण्यासाठी इंटरचेंजचाच वापर करावा लागतो. जिथे टोल नाका असतो तिथे वाहणाची एंट्री केली जाते. नंतर हा मार्ग सोडताना सुद्धा पुढील टोल नाक्यावरूनच खाली उतरता येते व तिथे टोल कर भरला जातो. मात्र १४ ठिकाणी क्रश बॅरियर तोडून रेतीचे डंपर महामार्गांवर प्रवेश करतात व सुसाट वेगाने धावतात. 

त्या वाहनांची नोंद नाही कि टोल नाही 
आता अवैध रेती माफीयांनी धुमाकूळ घातला असून ते सरळ क्रश बॅरियर तोडून समृद्धी मार्गावर् प्रवेश करतात त्या वाहणाची कुठेही एंट्री होत नाही. जिथे उतरतात तिथेही असेच क्रश बॅरियर तोडलेल्या ठिकाणावरून खाली उतरतात. त्यामुळे कुठेही टोल नाही, एंट्री नाही असा प्रकार तिथे महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात सुरु आहे. म्हणजे आता हा  महामार्ग सुरक्षित राहिला नसल्याचे स्पष्ट झाले असून संबधित विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT