MSRTC Bus News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: धक्कादायक! शेगाव एस. टी. आगाराचा कारभार प्रशिक्षणार्थींच्या हातात; प्रवाशांच्या जिवाशी खेळ

Buldhana News: शेगावचे संपूर्ण एस. टी.बस आगार प्रशिक्षणार्थी विद्यार्थी चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रशिक्षणार्थींच्या हातात आगाराचे काम देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १६ मे २०२४

एकीकडे राज्यात वारंवार अपघाताच्या घटना घडत असतानाच शेगाव राज्य परिवहन मंडळाच्या आगारामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेगावचे संपूर्ण एस. टी.बस आगार प्रशिक्षणार्थी विद्यार्थी चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रशिक्षणार्थींच्या हातात आगाराचे काम देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

शेगाव राज्य परिवहन मंडळाचे एस. टी.बस आगार प्रशिक्षणार्थी विद्यार्थी चालवत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. नियमानुसार एस.टी. आगारमधील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रात्र पाळीत काम करण्यास परवानगी नाही. परंतु शेगाव आगारात रात्रपाळीला प्रशिक्षणार्थी विद्यार्थी बसेसची दुरुस्ती करताना दिसून येत आहेत.

आगारामध्ये कायमस्वरूपी असलेले मेकॅनिक दांडी मारून संपूर्ण आगार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यावर सोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र कॅमेरात कैद झाले आहे. याबाबत आगार व्यवस्थापक मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. प्रशिक्षणार्थी दुरुस्त करत असलेल्या बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत.

एकीकडे कधी बसचे चाक निखळून पडत आहे, तर कधी बसेस रस्त्यात बंद पडत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या भरवशावर आगराचा कारभार सुरू असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता आगार प्रशासक काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

SCROLL FOR NEXT