Buldhana News Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: जलविहार करताना स्टंटबाजी जीवावर बेतली! २० वर्षीय तरुण बुडाला; चालकाने वाचवला एकाचा जीव

Buldhana Latest News: या दोघांमधील एकाला नौका चालकाने वाचविले. मात्र दुसरा रोशन इंगळे हा पाण्यात बुडाला.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana News: बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहेकेर तालुक्यातील देऊळगावमाळी जवळ असलेल्या कोराडी प्रकल्पात एक युवक बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रोशन मुरारी इंगळे असे या बुडालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेहेकर तालुक्यातील देऊळ गावमाळी जवळ असलेल्या कोराडी प्रकल्पात विवेकानंद स्मारकावर आज दुपारीच्या सुमारास लक्ष्मण गजानन इंगळे, (वय 22 वर्ष) आदेश किशोर इंगळे(वय 21 वर्ष) ऋतिक भारत सोनूने (वय वर्षे 23,) अनिकेत गणेश सुरडकर (वय वर्ष 24) हे तरुण प्रतिकन्या कुमारी परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

यावेळी तरुणांनी त्याठिकाणी तलावातील नौका विहार करण्याचा निर्णय घेऊन नौकेत् फेरफटका मारायला सुरवात केली. शेवटी नौका किनाऱ्यावर यायला लागली तेव्हा नौकेतील दोघांनी तलावात उडी मारून स्टँटबाजी करण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

हीच स्टंटबाजी त्यांच्या जीवावर आली आणि हे तरुण बुडायला लागले. त्यामधील एकाला नौका चालकाने वाचविले. मात्र दुसरा रोशन इंगळे हा पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीससुद्धा घटनास्थली पोहोचले. ज्यानंतर रोशन इंगळेचा शोध मोहिम सुरू केली. मात्र अद्याप रोशन इंगळे याचा मृतदेह सापडला नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Buldhana News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

Maharashtra Nurses Strike : आरोग्य यंत्रणा ठप्प होणार? नर्सचा संपाचा इशारा | VIDEO

Ambarnath : भरधाव स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले खाली; अंबरनाथमधील धक्कादायक घटना, घटना सीसीटीव्हीत कैद

'भोजपुरीमध्ये बोलून दाखव...' उत्तर प्रदेशमध्ये मराठी तरुणाला दमदाटी|VIDEO

SCROLL FOR NEXT