Kolhapur Crime: कोल्हापुरात खळबळ! पार्किंगच्या वादातून दोन गटात हाणामारी; ५ जण जखमी

Crime News Update: यावेळी दोन्ही बाजूंनी कांदा कापण्याच्या सुरीसह मिळेल ते हत्यारे घेऊन एकमेकांवर हल्ला सुरू झाला
Kolhapur News
Kolhapur NewsSaamtv
Published On

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

Kolhapur Latest News: कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर इथे पार्किंगच्या वादातून हॉटेल मालक आणि अंडा आमलेट हातगाडी चालकामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी दोन्ही गटाकडून झालेल्या चाकू हल्ल्यात परस्परविरोधी गटातील पाच जण जखमी झाले. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. (Crime News In Marathi)

Kolhapur News
Latur News: अंधार करता येणार नाही; CCTV बंधनकारक! लातूरमधील कॉफी शॉपसाठी नवीन नियमावली प्रसिद्ध...

पार्किंगवरुन वाद...

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरच्या (Kolhapur) व्हिनस कॉर्नर इथं शिवाजी मोरे यांचा हॉटेल आहे तर याच हॉटेल समोर शेख यांच्या अंडा आमलेटच्या हातगाड्या आहेत. बुधवारी (२१, जून) रात्री उशिरा हॉटेल समोर पार्किंग करण्याच्या वादातून शेख आणि मोरे यांच्यामध्ये वाद झाला. याच वादातून हाणामारी सुरू झाली.

यावेळी दोन्ही बाजूंनी कांदा कापण्याच्या सुरीसह मिळेल ते हत्यारे घेऊन एकमेकांवर हल्ला सुरू झाला. यावेळी मोरे यांच्या समर्थकांनी शेख यांच्या दोन हातगाड्या उलथून टाकून एक दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली. यानंतर जखमींना सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले यावेळी पुन्हा दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.

Kolhapur News
ST Bus Accident: ७० पेक्षा जास्त प्रवासी, चढावावरच एसटी बसचे ब्रेक फेल; आरडाओरड अन् गोंधळ; मलकापूर- सोलापूर मार्गावर अपघात

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मोरे यांचे समर्थक सीपीआर रुग्णालयात मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी रुग्णालयात घुसण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. सध्या जखमी शिवाजी मोरे आणि वैभव मोरे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com