संदीप भोसले, प्रतिनिधी....
Latur News: लातूर जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील कॉफी शॉपसाठी (Coffee Shop) नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. ज्यानुसार, यापुढे आता कोणत्याही कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही. सोबतच प्रत्येक कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही असणे देखील बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे कॉफी शॉपसाठी आता नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील (Latur) कॉफी शॉप व हॉटेल मध्ये गैरकृत्यांना चालना मिळेल अशा बैठक व्यवस्था आणि इतर गैर्यकर्त्यास देखील चालना मिळणाऱ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे कॉफीशॉपमध्ये अल्पवयीन मुले-मुली यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता.
हे कॉफी चालक जोडप्यांकडून त्यांना बसण्याकरिता तासाच्या हिशोबाने शुल्क घेत होते. यामुळे युवक व युवती तसेच अल्पवयीन मुले-मुली हे तासनतास बसून अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी येवू लागल्या होत्या. आता त्याच अनुषंगाने लातूर पोलिसांनी जिल्ह्यातील कॉफी शॉप, व हॉटेल यांना निर्बंध घालून दिले आहेत.
1) कॉफी कॅफे , हॉटेल मधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असणे बंधनकारक आहे.
2)कॉफी कॅफे व हॉटेलमधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत.
3) कॉफीशॉप मधील बैठक व्यवस्था सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी असावी.
4) कॉफीशॉप, बंदिस्त कंपार्टमेंट मध्ये उभारलेले नसावे.
5) कॉफीशॉप, मध्ये भेट पुस्तिका (व्हिजीट बुक) ठेवावे.
6) कॉफीशॉप , मध्ये होम थेटर, डॉल्बी, व इतर ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणारी कुठलीही उपक्रम नसावेत.
7) कॉफीशॉप, मध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई असणारय.
8) कॉफीशॉप, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच चालू राहतील.
दम्यान या नियमांचे उल्लंघन केल्यास कॉफी शॉप व्यवसायिकांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे कॉफी शॉपमध्ये गैरवर्तन करण्यासाठी जाणाऱ्या जोडप्यांना आता चांगलाच आळा बसणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.