Buldhana Zp Saam tv
महाराष्ट्र

Zp School : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटली; ३५ शिक्षक निलंबित, सीईओंची कठोर कारवाई

Buldhana News : जिल्हा परिषद शाळा आजच्या स्पर्धेच्या काळात मागे पडत आहेत. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र

Rajesh Sonwane

संजय जाधव 
बुलढाणा
: राज्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. मुळात शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याने शाळांमध्ये मुलांना पाठविण्यास पालक वर्ग तयार नाहीत. परिणामी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होत चालली आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती असून जिल्हा परिषद सीईओनी कठोर कारवाई करत पटसंख्या कमी असलेल्या शाळांमधील ३५ शिक्षकांचे निलंबन केले आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळा आजच्या स्पर्धेच्या काळात मागे पडत आहेत. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे; यासाठी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेत असतात. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम देखील चांगला दिसून आला आहे. 

जिल्ह्यातील शाळा बंद पडण्याची स्थितीत 
दरम्यान बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. बहुतांश शाळांमधील पटसंख्या हि बोटावर मोजण्या इतकी राहिली आहे. यामुळे शाळा बंद पडण्याची स्थितीत आहे. यामुळे याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. 

सीईओंकडून कारवाई 

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या २० शाळांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये कार्यरत असलेल्या ३५ शिक्षकांचे निलंबन आदेश जारी केले आहेत. तसेच ६० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सीईओंच्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात मात्र खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

Nashik : गोदावरीला पूर; जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं | VIDEO

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

SCROLL FOR NEXT