Buldhana Car Accident  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana : भरधाव कार कठड्यावर आदळली; ६ वर्षीय चिमुकल्यासह वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Car Accident : बुलडाण्यात (Buldhana) अपघाताची एक भयंकर घटना घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या कारला अचानक जनावरे आडवे आल्याने कार अनियंत्रित होऊन थेट पुलाच्या कठड्यावर धडकली. या दुर्देवी घटनेत एका ६ वर्षीय चिमुकल्यासह वृध्द महिलेचा जागीच मृ्त्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Buldhana News Today)

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील गणेशपूर -मोहाडी रस्त्यावर पहाटे घडली. जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील अवचार कुटुंबिय काही कामानिमित्त मंगळवारी पहाटे चिखलीकडे कारने जात होते. दरम्यान, मोहाडी-गणेशपूर रस्त्यावर त्यांच्या वाहनाच्या समोर जनावर आडवे आल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली.

या भीषण अपघातात नंदा विठ्ठल अवचार (वय ६०), ऋषभ अंगत अवचार (वय ६) जागीच ठार झालेत. तर अंगत विठ्ठल अवचार (वय ३५), माधुरी अंगत अवचार (वय ३०), कु. परी अंगत अवचार (वय ०२) गंभीर जखमी झाले. जखमींपैकी पती-पत्नी असलेल्या अवचार दाम्पंत्याला खामगांव खाजगी रुगणालयात हलविण्यात आले.

तर दोन वर्षीय बालिकेवर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगत विठ्ठल अवचार हे चिखली येथील भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलीसात अपघातात नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT