पाकिस्तानात मोठी दुर्घटना! धावत्या बसला भीषण आग, १७ जण होरपळले, पाहा थरारक VIDEO

पाकिस्तानच्या सिंध जिल्ह्यात बुधवारी एका बसला भीषण आग लागून बसमधील १७ जणांचा मृत्यू झाला.
Pakistan Bus Fire Video
Pakistan Bus Fire VideoSaam TV

कराची : पुराचा कहर असलेल्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) आणखी एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या सिंध जिल्ह्यात बुधवारी एका बसला भीषण आग लागून बसमधील १७ जणांचा मृत्यू झाला. ही घटना कराचीपासून ९० किमी अंतरावर असलेल्या नूरियाबाद शहरात घडली. अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. (Pakistan Bus Fire Viral Video)

Pakistan Bus Fire Video
Petrol Diesel Prices : वाहनधारकांना दिलासा! 'या' चार राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

पाक अधिकार्‍यांनी या घटनेला दुजोरा दिला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी नुरियााबादजवळील महामार्गावर खैरपूर नाथन शाह भागात जाणाऱ्या बसला आग लागल्याने तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला. तर २० हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले.

पाकिस्तानी मीडियानुसार, कराची शहराअंतर्गत सुरू असलेली बस ५० हून अधिक पूरग्रस्तांना घेऊन जात होती, हे पुरग्रस्त कराचीमध्ये तात्पुरत्या आश्रयस्थानात राहत होते. खैरपूर नाथन शाहच्या दिशेने ही बस जात असताना या बसला नूरियााबादजवळ बसला आग लागली.

अचानक बस लागल्याने बसमधील काही प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. उर्वरित प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. या दुर्घटनेत १७ प्रवाशी होरपळले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पाकिस्तानी पोलिसांनी सांगितले.

सिंध संसदीय आरोग्य सचिव कासिम सौमरो यांनी अपघातातील मृतांच्या संख्येची पुष्टी करताना सांगितले की, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले १२ प्रवासी अल्पवयीन असून त्यांचे वय 15 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे. बसमधील सर्व प्रवासी खैरपूर नाथन शाह या एकाच गावातील रहिवासी होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com