Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; बुलढाण्यात धावत्या ट्रकमधून तलाठी व कोतवालास ढकलले, तलाठ्यास चिरडण्याचा प्रयत्न

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुका हा अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरु असल्याचे बोलले जात आहे

संजय जाधव

बुलढाणा : मागिल काही दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील महसूल विभागाच्या आशीर्वादाने खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती उपसा आणि वाहतूक जोमाने सुरू आहे. दरम्यान देऊळगावराजाचे तलाठ्याने अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर कारवाईसाठी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत पकडलेला वाळूचा ट्रक घेऊन जात असताना तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून फेकून दिल्याची घटना घडली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील  देऊळगावराजा तालुका हा अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मोठी पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला अवैध रेती वाहतूकदारांवर कदम कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

तलाठ्याने पकडला वाळूचा डंपर 

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार काल सायंकाळी नांदुरा शहराजवळ नांदुरा तहसीलचे तलाठी नितीन म्हस्के व कर्मचारी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यासाठी थांबले. यात एक अवैध रेतीचा डंपर त्यांनी थांबवला. यानंतर चालकास कागदपत्रे विचारले असता त्याकडे काही आढळले नाही. म्हणून सदर तलाठी व कोतवाल अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये बसले व ट्रक सरळ तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचे चालकाला सांगितले. 

तलाठी, कोतवालास ट्रकमधून फेकले 

मात्र चालकाने त्यांना शिवीगाळ करत ट्रक भरधाव मलकापूरकडे घेतला. यानंतर धावत्या ट्रकच्या केबिनमधूनच तलाठी व कोतवालास लाथ मारून ट्रक खाली ढकलले. यात कोतवाल व तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गंभीर कलमान्वये ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप ट्रक चालक फरार आहे. यामुळे मात्र बुलढाणा जिल्ह्यात रेतीमाफी यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

तलाठयांस चिरडण्याचा प्रयत्न

देऊळगावराजा तालुका हा अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मात्र  स्थानिक  महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असलेली रेती माफियागिरी आज त्यांच्याच विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठल्याचे पाहण्यास मिळाले. देऊळगावराजाचे तलाठी परमेश्वर बुरकुल यांनी अवैध रेती वाहतूक करणारा डंपर कारवाईसाठी अडविण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने भरधाव असलेला डंपर त्यांच्या अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु, बुरकुल यांनी बाजूला उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना जबर मार लागला असून मेंदूला मार बसला आहे. त्यांच्यावर सध्या जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT