Buldhana Private Bus Fire Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Bus Fire : बुलढाण्यात खाजगी बसला भीषण आग, ४८ प्रवासी थोडक्यात बचावले; पाहा VIDEO

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या मेहकर फाटा येथे सोमवारी (ता २४) रात्रीच्या सुमारास एका खाजगी लक्झरी बसने अचानक पेट घेतला. या बसमधून तब्बल ४८ प्रवासी प्रवास करीत होते. आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी वेळीच बाहेर पडून कसाबसा आपला जीव वाचवला. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने बस पूर्णत: जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. भररस्त्यातच बसने पेट घेतल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन खाजगी बस बुलढाण्याकडे परतत होती. चिखली तालुक्यातल्या मेहकर फाटा येथे बस आली असता. काही प्रवासी चहा घेण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी बसमध्ये अचानक शॉर्टसक्रिट झाले. त्यामुळे क्षणार्धात बसला आग लागून मोठा भडका उडाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी बाहेर पडून कसाबसा आपला जीव वाचवला.

सुदैवाने प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. अगदी वर्षभरापूर्वी बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला होता. बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. सोमवारी याच घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

SCROLL FOR NEXT