Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

बंडखोर आमदारांच्‍या बॅनरवरून मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो गायब

बंडखोर आमदारांच्‍या बॅनरवरून मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो गायब

संजय जाधव

बुलडाणा : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांबाबत कुठे समर्थक तर कुठे विरोधात निदर्शने केल्या जात आहेत. यात बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्‍या समर्थकांनी लावलेल्‍या बॅनरवरून मुख्‍यमंत्र्यांचाच फोटो गायब आहे. (buldhana Photo of CM Uddhav Thackeray disappears from the banner of rebel MLAs)

बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील दोन शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांचे समर्थन तर विरोध केला जात आहे. बुलडाणा शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी शनिवारी रॅली काढली. तर आज शहरातील संगम चौक येथे बॅनर सुद्धा लावले आहे. या बॅनरची शहरात मोठी चर्चा होताना दिसत आहे. बॅनरवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटोसह बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहे. मात्र आजपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशिवाय कुठलेही बॅनर तयार होत नव्हते. आज मात्र या बॅनरवरून उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे.

आमदारांबद्दल नागरीकांमध्‍येही रोष

प्रथमच शिवसेना पक्षावर निवडून आलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी बंडखोरी केल्यामुळे समर्थक शिवाय सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आलाय. मात्र दहशतीमुळे सामान्य नागरिक उघड उघड बोलत नसल्‍याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT