Dengue Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : बुलढाण्याच्या रायपूरमध्ये एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू; संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह आणला ग्रामपंचायत समोर

Buldhana News : बुलढाणा तालुक्यातील रायपूर गावातील नाल्या तुडुंब भरलेले आहेत. ज्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

संजय जाधव

बुलढाणा : घाणीच्या साम्राज्याने साथरोगांचा फैलाव होत आहे. यात बुलढाणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतच्या गलथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळेच गावात साथरोग पसरले असून यात गावातील एका व्यक्तीचा डेंग्यूने मृत्यू झाला असून हा मृत्यू ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराने झाल्याचा आरोप करत नागरिकांनी मृतदेह थेट ग्रामपंचायतीच्या समोर आणून ठेवला आहे. 

बुलढाणा (Buldhana) तालुक्यातील रायपूर गावातील नाल्या तुडुंब भरलेले आहेत. ज्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशातच गावातील गजानन करडेल (वय ४८) या व्यक्तीला डेंग्यूचे (Dengue) निदान झाल्यानंतर प्रथम बुलढाणा व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करत मृतदेह हा संभाजीनगर येथून सरळ ग्रामपंचायत समोर ठेवल्याने एकच खळबळ उडाली. 

यावेळी नातेवाईकांनी तात्काळ ग्रामपंचायतने (Grampanchayat) गावात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य वाचवावे; अशी मागणी लावून धरली. नातेवाईकांचा हा आक्रमक पवित्रा पाहता ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी आपल्या पथकासह ग्रामपंचायत गाठून संतप्त झालेल्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामपंचायत कडून आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT