Dj Ban Saam tv
महाराष्ट्र

Shegaon News : शेगावमध्ये गणेशोत्सवासह इतर मिरवणुकीमध्ये डीजे बंदी; न वाजवण्याची शपथ, मंडळांना मिळणार ५१ हजाराचे बक्षीस

Buldhana News : लग्न समारंभ, वाढदिवस, मिरवणुकांमध्ये डीजे लावण्याचे फॅड सध्या वाढले आहे. मात्र या कर्ककर्कश आवाजामुळे अनेकांना विविध आजार जडले आहेत.

संजय जाधव

बुलढाणा : अलीकडच्या काळामध्ये डीजेचे मोठे फॅड आल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी लहान मोठे समारंभमी लग्न समारंभ असो कि काही मिरवणूक असो, यात मोठ्याने आवाज करणारे डीजे आवर्जून लावले जातात. मात्र डीजे वाजविल्याशिवाय देखील समारंभ पार पडू शकतो; या विचारातून शेगावमध्ये अगदी गणेशोत्सवासह कोणत्याही मिरवणुकीत डीजे न लावण्याची शपथ घेत डीजे बंदी करण्यात आली आहे. 

लग्न समारंभ, वाढदिवस, मिरवणुकांमध्ये डीजे लावण्याचे फॅड सध्या वाढले आहे. मात्र या कर्ककर्कश आवाजामुळे अनेकांना विविध आजार जडले आहेत. तर दुसरीकडे टाळ मृदंग, सनई चौघडा ही परंपरा देखील लोप पावत चालली आहे. याचाच विचार करून (Buldhana) बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने पुढाकार घेतला आहे. या पुढाकारातून गणेश उत्सव असो किंवा इतर मिरवणुकींमध्ये डीजे न वापरण्याची शपथ घेतली आहे. अर्थात डीजे वाजविण्यावर एक प्रकारे बंदी घालण्यात आली आहे.  

५१ हजाराचे बक्षीस देणार 

डीजे न वाजविण्याबाबत शपथ घेण्यासोबत (shegaon) मिरवणुकांमध्ये सामाजिक प्रबोधन करणाऱ्या मंडळांना ५१ हजारांचे बक्षीस देण्याचे मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्यावतीने जाहीर केले आहे. तर जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये देखील डीजे बंदी संदर्भात निर्णय घ्यावा; अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire: झोपडपट्टीला भीषण आग, १५ झोपड्या जळून खाक|VIDEO

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

सेल्फीचा मोह जीवावर बेतला, तरुण थेट नदीत पडला|VIDEO

Maharashtra Live News Update : मालेगाव घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या अकोलेत मोर्चा

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू ; वयाच्या ४० व्या वर्षी निधन,संगीत विश्वात शोककळा पसरली

SCROLL FOR NEXT