Ravikant Tupkar Latest News Saam TV
महाराष्ट्र

Ravikant Tupkar: सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा... रविकांत तुपकरांचा थेट इशारा

Ravikant Tupkar News: शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Ravikant Tupkar Latest News

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा १५ डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस आंदोलनाचा स्फोट होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं.

बुलढाण्यात सलग ५ दिवस त्यांचं हे आंदोलन सुरू होतं. यादरम्यान, त्यांची प्रकृती सुद्धा खालावली होती. रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल. मात्र मी आंदोलनावर ठाम आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, असं तुपकरांनी म्हटलं होतं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर तुपकर हजारो कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांसह मुंबईत देखील दाखल झाले होते. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मंत्रालय बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर तुपकरांनी (Ravikant Tupkar) आंदोलन मागे घेतलं होतं.

सरकारने आपल्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या उर्वरीत मागण्यांसाठी आम्ही १५ दिवसांचा वेळ दिला आहे. असंही तुपकर म्हणाले होते. अन्नत्याग उपोषणानंतर तुपकर यांची प्रकृती देखील खालावली होती. त्यांना उपचारासाठी मुंबई (Mumbai) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री रविकांत तुपकर प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आले. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सोयाबीन-कापूस आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या सोमठाणा गावकऱ्यांची भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली. मुंबई बैठकीत झालेली सविस्तर माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली.

सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. अंमलबजावणीसाठी आपण सरकारला १५ दिवसाचा अवधी दिला आहे. जर सरकारने १५ डिसेंबर पर्यंत दिलेला शब्द पाळला नाही, तर त्यानंतर सोयाबीन-कापूस आंदोलनाचा स्फोट होईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT