Maratha Reservation Protest Buldhana Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आंदोलकांचा नागपूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maratha Aarkshan Andolan: नागपूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.

Gangappa Pujari

संजय कदम, प्रतिनिधी

Maratha Reservation Protest:

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. कालपासून या लढ्याला हिंसक वळण लागले. राजकीय नेत्यांना गावबंदी, नेत्यांची घरे जाळल्याच्याही घटना समोर येत आहेत. गावागावांमध्ये उपोषणे, आंदोलने सुरू असून नागपूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलन, जाळपोळ होत असून आज नागपूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथ मराठा समाज आक्रमक झाला.

गावातील मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन असून देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अर्ध्या तासांपासून रास्ता रोको होत असल्याने यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी होत असून तत्काळ आरक्षण मिळावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

साताऱ्याच्या माण तालुक्यात आंदोलनाला हिंसक वळण..

दरम्यान, साताऱ्याच्या माण तालुक्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. रात्री मुक्कामी असलेली बस फोडल्याचा प्रकार गोंदवले गावात घडला आहे. यामुळे सातारच्या दहिवडी आगारातून सकाळपासून (St Bus) बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

SCROLL FOR NEXT