Saam Tv
बऱ्याचदा महत्वाच्या कामाला जाताना काही प्राणी आणि पक्षी दिसणे अशुभ मानलं जातं. त्याबद्दल पुढील मुद्द्यात माहिती देण्यात आली आहे.
घराच्या छतावर कावळा वारंवार बसून ओरडत असेल तर ते अशुभ संकेत मानले जातात. काही लोकांच्या मते, सतत कावकाव ऐकू येणे म्हणजे अडचणी किंवा वाईट बातमीची शक्यता.
अंधश्रद्धेनुसार घराजवळ घुबड ओरडणे अशुभ मानले जाते. परंतु धार्मिक मान्यतेनुसार घुबड समृद्धीचे प्रतीकही आहे, त्यामुळे काही मतभेद दिसतात.
महत्वाच्या कामाला जाताना काळी मांजर रस्त्यातून आडवी गेली तर काही वेळ थांबावे अशी समजूत आहे. हे अपशकुन मानले जात असले तरी वैज्ञानिक आधार नाही.
शरीरावर सरडा पडणे किंवा घरात वारंवार दिसणे अशुभ संकेत मानले जातात. शकुनशास्त्रात याला अचानक अडचणींची सूचना असे म्हटले आहे.
घरासमोर किंवा रस्त्यात साप दिसणे संकटाचे संकेत मानले जातात. काहींच्या मते हे शत्रूंच्या कारस्थानांचे किंवा अडथळ्यांचे प्रतीक असते.
रात्री कुत्रे सतत ओरडत असतील तर ते अशुभ संकेत मानले जातात. लोकविश्वासानुसार हे वाईट घटनेची चाहूल समजली जाते.
घरात वटवाघूळ येणे किंवा छताला लटकणे अशुभ मानले जाते. शकुनशास्त्रात याला आर्थिक किंवा आरोग्यविषयक अडचणींचा इशारा मानतात.