Khamgaon Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Khamgaon Heavy Rain : खामगावात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस; अनेकांच्या घरात शिरले पाणी

Buldhana News : राज्यात मान्सून दाखल झाला असून काही ठिकाणी अजूनही प्रतीक्षा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला होता.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मध्यरात्रीच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटांसह खामगाव शहरात पाऊस धो धो स्वरूपात बरसल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळाले. रात्रीच्या पावसामुळे घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. 

राज्यात मान्सून (Rain) दाखल झाला असून काही ठिकाणी अजूनही प्रतीक्षा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला होता. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास खामगाव शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला. धो धो बरसणाऱ्या या पावसामुळे अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरलं. (Heavy Rain) त्यामुळे दुकानातील साहित्यांचे मोठं नुकसान झालं आहे. बाहेर पाऊस सुरु अन घरात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

पहिल्याच पावसात दाणादाण 

तसेच खामगाव (Khamgaon) शहरातून वाहणारी बोर्डी नदीला देखील पूर आला होता. तसेच फरशी भागात पाणीच पाणी दिसून आले. अचानक आलेल्या या ढगफुटी सदृश्य पावसाने खामगाव शहरात प्रचंड नुकसान केल आहे. खामगाव शहराच्या फरशी भागातील ही दृश्य बरंच काही सांगून जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT