Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident: भीषण अपघात! एसटी बस आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांसह प्रवासी जखमी

Buldhana Accident: बुलढाण्यातील लाखनवाडा ते उदयनगर रस्त्यावर एसटी बस आणि मालवाहू वाहनाची जोरदार धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. ५ डिसेंबर २०२३

Buldhana Breaking News:

बुलढाण्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील लाखनवाडा ते उदयनगर रस्त्यावर एसटी बस आणि मालवाहू वाहनाची जोरदार धडक होऊन अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाण्यातील (Buldhana) लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान रस्त्यावर असलेल्या पिंप्री कोरडे गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. खामगाव आगाराची बस लाखनवाड्यावरून उदयनगर कडे जात होती. बस मध्ये एकूण ४७ प्रवाशी प्रवास करत होते.

यावेळी पिंपरी कोरडे गावाजवल विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली गेली. दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झालेत. तसेच बस मधील शाळकरी विद्यार्थ्यांसह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, बसचालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यामध्ये School Busचा भीषण अपघात...

दरम्यान, पुण्यामध्ये (सोमवार, ४ डिसेंबर) स्कूल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. शाळेची भरधाव बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. पुण्यातील वाघोली रायझिंग स्टार या शाळेची ही बस होती. अपघातावेळी शाळकरी मुले देखील बसमध्ये होती. यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल, वीजपुरवठा राहणार बंद

बॉलिवूड हादरलं! फक्त रोहितचं नव्हे गँगस्टरच्या निशाण्यावर ५ मोठे सुपरस्टार्स; मुंबई पोलिसांचा धोक्याचा इशारा

Ration Card: टेन्शन देणार बातमी! या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे बंद; मिळणार नाही लाभ; तुमचंही नाव आहे का?

Health Care : दररोज बीट खाण्याचे फायदे, जाणून घ्या

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT