Buldhana Chikhali Dahihandi Fight Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Chikhali Dahi Handi : चिखलीत दहीहंडी कार्यक्रमात तुंबळ हाणामारी; थरारक VIDEO व्हायरल

दहीहंडी कुणी फोडायची यावरून सुरूवातीला दोन गटात वाद झाला.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टिव्ही

Buldhana Chikhali News : शुक्रवारी राज्यभरात दहीहंडीचा (Dahi Handi) उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी गोविदांनी थरावर थर रचत दहीहंडी फोडली. काही ठिकाणी या कार्यक्रमाला गालबोटही लागलं. बुलडाण्यात (Buldhana) काहीसा प्रकार पाहायला मिळाला. जिह्यातील चिखली शहरात भाजप आमदार श्वेता महाले पाटील यांनी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दोन गटात तुफान राडा झाला. (Chikhali Govinda Dahihandi Fight Viral Video)

प्राप्त माहितीनुसार, दहीहंडी फोडण्यावरून ही हाणामारी झाली. दहीहंडी कुणी फोडायची यावरून सुरूवातीला दोन गटात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटात सदस्य एकमेकांवर तुटून पडले. या सर्व प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मध्यरात्रीपर्यंत हा राडा सुरूच होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटातील सदस्यांना हुसकावून लावलं. अखेर दहीहंडी न फोडताच कार्यक्रम संपला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, एकीकडे दहीहंडी उत्साहात साजरी करताना दुसरीकडे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात एक भयंकर घटना घडलीये. दापोली गावातील पाज पंढरी गावातील एका गोविंदाचा नाचतांना मृत्यू झालाय. वसंत लाया चौगले असं मृत्युमुखी पडलेल्या गोविंदाचं नाव आहे.

अचानक नाचत असताना चौगुले यांच्या छातीत कळ आली आणि त्यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला. नाचताना ते जमिनीवर कोसळले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकार्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Signs Of Kidney Failure: किडनी फेल झाल्यानंतर शरीरात दिसतात ही गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध

Supreme Court: बायकोनं नवऱ्याला बोटावर नाचवू नये; सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

Mumbai To Pandharpur Travel: मुंबईपासून पंढरपूरपर्यंत कसे पोहोचावे? रेल्वे, बस, कार किंवा विमान कोणता मार्ग सर्वोत्तम?

Kokan Rain Alert : कोकणात पावसाची दमदार बॅटिंग, हवामान खात्याचा यलो अलर्ट; पुढील दोन दिवस वातावरण कसं राहील?

Maharashtra Live News Update: मुंबई एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे सेनेत राडा

SCROLL FOR NEXT