Crop Insurance Saam tv
महाराष्ट्र

Crop Insurance : शेतकऱ्यांना विम्याची तुटपुंजी रक्कम; पिक विमा प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी घातला घेराव

Buldhana News : अनेकांचा विमा रीजेक्ट दाखवत असल्याने विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याच्या तक्रारी घेऊन कृषी कार्यालयात विमा प्रतिनिधी यांना शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांनी घेराव घालीत जाब विचारण्यात आला

संजय जाधव

बुलढाणा : पिकांना सुरक्षा कवच म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. मात्र शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विम्याची तुटपुंजी रक्कम देण्यात आली आहे. तसेच काहींची विमा रक्कम पोर्टलवर झिरो दाखवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज विमा कंपनी प्रतिनिधींना घेराव घालत जाब विचारला आहे. 

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरु केली. या योजनेत अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत पिकांना विम्याचे सुरक्षा कवच दिले होते. मात्र नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याचे पाहण्यास मिळते. तर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजी अशी रक्कम देण्यात आली आहे. तर काहींच्या खात्यात शून्य रक्कम दिसत आहे. अनेकांचा विमा रीजेक्ट दाखवत असल्याने विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याच्या तक्रारी घेऊन कृषी कार्यालयात विमा प्रतिनिधी यांना शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांनी घेराव घालीत जाब विचारण्यात आला. 

सर्वांना विम्याची रक्कम मिळावी 

पिक विमा न मिळालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना विमा देण्यात यावा, धुऱ्यांला धुरा लागून शेतजमीन आहे. क्लेम तारीख एक आहे असे असतांना कमी जास्त विमा मिळाला असल्याने याबाबत सर्वे फॉर्म चेक करण्यात येवून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना मिळावी. यासाठीचा प्रस्ताव तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून शासनास पाठवून उर्वरित विमा रक्कम अदा करण्यात यावी. विमा मिळालेले आणि विमा मिळणेपासून पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी विभाग व विमा कार्यालयात लावण्यात येवून शेतकऱ्यांची हेळसांड थांबविण्यात यावी, अशी मागणी यावेळी विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. 

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा 

दरम्यान यावर तातडीने उपाययोजना करण्याचे व तक्रार निवारण समितीची बैठक घेण्याचे अश्वासन प्रशासानच्या वतीने देण्यात आले असून शेतकऱ्यांची रक्कम अपलोड होवून आठवडाभरात खात्यात जमा करु असे आश्वासनही देण्यात आले. मात्र मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT