Buldhana Breaking News  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: उद्धव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी; VIDEO तुफान व्हायरल

Buldhana News Today: बुलढाण्यातील उद्धव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana Breaking News

बुलढाण्यातील उद्धव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात चांगलाच राडा झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेनं काँग्रेसमधील (Congress) गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीचे बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. २१) खामगाव येथील जे.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांची सभा संपताच सर्व नेते आपआपल्या मार्गाने निघाले.

यावेळी सभास्थळावरुन बाहेर पडत असताना खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात काही कारणावरुन बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही नेत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.

यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवला. या घटनेमुळे काँग्रेस मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

SCROLL FOR NEXT