Lonar Government Hospital Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: अरेरे! रुग्णालयात विडी पेटवली, स्वतःलाही पेटवून घेतलं; रुग्णालयात तरुणाचा होरपळून मृत्यू

Lonar Government Hospital: लोणार येथील ग्रामीण रुग्णालायत एका मनोरुग्णाने स्वतःला पेटवून घेतं. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

बुलडाण्यामध्ये एका तरुणाने रुग्णालयामध्ये स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयामध्येच हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

लोणार येथील ग्रामीण रुग्णालायत एका मनोरुग्णाने स्वतःला पेटवून घेतं. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाला रात्रीच ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या तरुणाने विडी पिण्यासाठी माचीसची काडी पेटवली आणि स्वत:ला आग लावून घेतली. या आगीमध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणताही रुग्ण नव्हता. या धक्कादायक घटनेनंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे की डॉक्टर कुठे होते? तसेच रुग्णाल्यातील नर्स कुठे होत्या? या घटनेने रुग्णसेवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे लोणार हा तालुका केंद्रीय मंत्री प्रतापरावं जाधव यांच्या मतदारसंघामध्ये येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT