Buldhana Rain Saam v
महाराष्ट्र

Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; सिंदखेडराजा तालुक्यात शेतीला तलावाचे स्वरूप, साचलेल्या पाण्यात आंदोलन

Buldhana News : पावसामुळे शेतात पाणी साचले असून याचे पंचनामे सुरु असून शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी साचलेल्या पाण्यात आंदोलन सुरू केले. तसेच जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.केली आहे

Rajesh Sonwane

बुलढाणा : राज्यात सर्वदूर सलग मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून होत्याचे नव्हते झाले आहे. परिणामी शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. दरम्यान शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना केली जात नसल्याने शेतकरी संकट सापडला आहे. दरम्यान शेतात साचलेल्या पाण्यातच शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सततधार पाऊस कोसळत आहे. तर काही दिवसापासून ढगफुटी झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेताना तलावाचे स्वरूप आले आहे. पळसखेड चक्का या गाव परिसरातील शेताला तलावाच स्वरूप आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात बसून आंदोलन सुरु केले. तातडीने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतातील पाण्यात पोहून शासनाचा निषेध

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेतातील पिके उध्वस्त झाले असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असून हवाल्दीला झाला आहे. दरम्यान अद्याप पर्यंत पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात पोहून शासनाचा निषेध केला आहे. तात्काळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर शेतात साचलेल्या पाणयात पोहून शासनाचा निषेध करण्यात आला. 

शेतकऱ्यांना अश्रू अनावर 

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी गावात अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. सोयाबीन पिकासाठी केलेला खर्च नाही, हातातोंडाशी आलेला घास हिरावुन गेल्याने शेतकरी काकासाहेब जाधव यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या सोयाबीन शेत पुर्णताह पाण्याखाली आहे. तर गावातील देखील इतर शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालय. त्यामुळे मायबाप सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: या सोप्या स्किनकेअर टिप्स फॉलो करुन व्हा फेस्टिव्हलसाठी तयार, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग आणि सोफ्ट

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Maharashtra Live News Update : नारायणपूरच्या पोलीस अधीक्षकांसमोर १६ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

Shweta Tiwari: वयाची चाळीशी ओलांडली तरी दिसतेय चिरतरुण; श्वेता तिवारीचं फिटनेस रुटीन काय?

SCROLL FOR NEXT