Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

NCP: महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

संजय जाधव

बुलढाणा : महाराष्‍ट्रातील प्रकल्‍प गुजरात राज्‍यात जात आहेत. याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव (Jalgaon) जामोद तालुक्याच्यावतीने निषेध करण्यात आला. तसेच ताबडतोब राज्य सरकारने (Maharashtra Government) हस्तक्षेप करत गेल्या काही महिन्यामध्ये राज्याबाहेर गेलेले प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत; अशी मागणी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

महाराष्ट्र हे उद्योग व्यवसायात प्रगत असलेले राज्य अशी ओळख संपूर्ण देशात आहे. गेल्या ६० वर्षात अनेक मोठमोठे (BUldhana) प्रकल्प महाराष्ट्रात आले. कारण आपल्या राज्यातील वातावरण उद्योग धंद्याकरीता पुरक असल्याचे परकीय गुंतवणुकदारांना सुध्दा वाटते. परंतु गेल्या ४ महिन्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून निघुन जात असल्याने निदर्शनास येते. यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन आहे. ज्या प्रकल्पामध्ये लाखो बेरोजगारांना रोजगाराची संधी होउ शकली असती. तो प्रकल्प मंजुर होउन त्यासाठी जागा सुध्दा निश्चीत झाली होती. तो प्रकल्प अचानक गुजरातला जाणे महाराष्ट्रातील युवकांसाठी क्लेषदायक आहे.

राज्‍यातील युवक रोजगारापासून वंचित

महाराष्ट्र राज्यातील लाखो युवक यामुळे रोजगारापासून वंचित राहिले. त्यानंतर अनेक छोटे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे दिसते. त्पामध्ये दोन तीन दिवसाआधी टाटा एअरबस हा प्रकल्प २२ हजार करोड रुपयांचा सुद्धा महाराष्ट्रातून गुजरातला मंजुर झाला. हजारो तरुण ज्या प्रकल्पामध्ये सुध्दा रोजगाराची संधी शोधत होते. परंतु महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे तो प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटुन गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली|VIDEO

Mukta Barve : "शाळा सोडून किती वर्ष झाली..."; मुक्ताला कोणती स्वप्ने पडतात? काय दिसतं?

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Mumbai : मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

Kitchen Hacks : फ्रिजमध्ये भाज्या फ्रेश ठेवण्यासाठीच्या भन्नाट टिप्स

SCROLL FOR NEXT