महाराष्ट्र

अस्वलाला जडली सवय..आठवडाभरापासून रात्री नित्‍य येतोय गावात‌; दहा ते बारा घरे फोडली

अस्वलाला लागली चटक..आठवडाभरापासून रात्री नित्‍य येतोय गावात‌; दहा ते बारा घरे फोडली

संजय जाधव

बुलढाणा : जंगल व्याप्त वरवंड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपरखेड येथे वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे दीड महिन्यांपासून मानव व प्राणी संघर्षाच्या ठिणग्या पडत आहेत. गेल्या आठवडाभरापासून एक भला मोठा अस्वल रात्रीला गावात येऊन घरफोडी करून घरातील अन्नधान्याची नासधूस करत आहेत. त्यामुळे गावात या अस्वलाची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर वनविभाग याकडे निष्काळजीपणा करत असल्याने स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. (buldhana-news-bear-coming-to-the-village-every-night-and-Ten-to-twelve-houses-were-broken-into)

गावामध्ये राहणारे सर्व नागरिक हे मजूर असून ते मोलमजुरीसाठी बाहेरगावी जात असतात. गावामध्ये म्हातारी माणसे हे लहान मुलांच्या शाळेसाठी त्यांच्यासोबत राहतात. अस्वल घराचे टिन पत्रे फाडून आणि दरवाजे तोडून घरात प्रवेश करत असल्याने गावात असलेले वृद्ध आणि लहान मुले खूप घाबरलेली आहेत. या अस्वलांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी गावातील नागरिकांनी आता गावाला संरक्षण भिंत बांधून द्यावी अन्यथा गावचे पुनर्वसन करावे अशी आग्रही मागणी केली आहे. ही मागणी तात्काळ पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा सरपंचासह गावकऱ्यांनी दिला आहे.

चार तास घरात बंद केले पण..

अस्वलाने आतापर्यंत दहा ते बारा घरांमध्ये घरफोडी केली. त्यात तेल, कडधान्य व खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची चटक लागली असून ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान होत आहे. भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी या घरफोड्या अस्वलाच्या बाबतीत वनविभागाकडे वारंवार तक्रार केल्या. एकदा तर अस्वल चार तास घरात बंद करून वनविभागाला कळवले. मात्र कर्मचारी आले नसल्याने ते अस्वल निघून गेले. त्यामुळे या गावातील एखाद्याचा जीव गेल्यावर वनविभाग दखल घेणार का? असा सवाल स्थानिकांकडून विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

SCROLL FOR NEXT