Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : रेशनाचा साठवलेला २५ क्विंटल तांदूळ जप्त; पुरवठा विभाग आणि पोलिसांची कारवाई

रेशनाचा साठवलेला २५ क्विंटल तांदूळ जप्त; पुरवठा विभाग आणि पोलिसांची कारवाई

संजय जाधव

बुलढाणा : रेशन लाभार्थीकडून खरेदी करण्यात आलेला आणि काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला २५ क्विंटल (Ration) तांदूळ साठा जप्त करण्यात आला आहे. पुरवठा विभागाने (Buldhana) सादर कारवाई केली आहे. (Live Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव - भालेगाव बाजार मार्गावरील एका गोदामात साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून छापा मारला असता गोदामात साठवणूक करण्यात आलेला ५७ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला आहे. खामगाव तालुका पुरवठा विभाग आणि पिंपळगावराजा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. तांदळाचा साठा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.

पोलिसात गुन्हा दाखल 

पोलिसांनी (Police) जप्त केलेला तांदळाचा हा साठा सय्यद आरीफ सै. हकीम या आरोपीचा असून त्याच्या विरोधात पिंपळगाव राजा पोलिसांत पुरवठा निरीक्षक विशाल भगत यांनी तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT