Buldhana Pulsar Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Buldhana Accident : नियंत्रण सुटल्याने भरधाव बाईक झाडावर आदळली, पंचविशीतल्या ३ मित्रांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा

Buldhana Pulsar Accident : बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली ते जाफराबाद रस्त्यावरील पळसखेड दौलत गावाजवळ पल्सर बाईकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बाईकवर असलेल्या तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे.

Prashant Patil

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : राज्यात अपघाताचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अनेक लोकांचा यात जीव देखील जातो. असाच एक भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली ते जाफराबाद रस्त्यावरील पळसखेड दौलत गावाजवळ झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या पल्सर गाडीचा अपघात झाला असून पल्सर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळली. या घटनेत गाडीवरील तिघेही युवक जागीच ठार झाले असून तिघेही सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी आहेत. मृतकांमध्ये रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार आणि सोनू उसरे यांचा समावेश आहे . ही तिघेही तरुण पंचविशीतील असून कुंभारी येथे जात असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातात ठार झालेले तिघेही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील राहणारे आहेत. रोहित महादू चाबूकस्वार (वय २४), शुभम रमेश चाबूकस्वार (वय २५) आणि सोनू सुपडू उसरे (वय २३) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. एमएच १५. ०७५७ क्रमांकाच्या पल्सर वाहनाने तिघे तरुण कुंभारी येथे जात होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

SCROLL FOR NEXT