Nandura News Nandura News
महाराष्ट्र

Nandura News : तरवाडीत तलाठी कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार; स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थ संतप्त

Buldhana News : स्मशानभूमी बांधताना रस्त्याचा कोणताही विचार केला नसल्यामुळे गेली दोन दशके नुसती नावापुरतीच आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाजवळ मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रशासनाचा निषेध

संजय जाधव

बुलढाणा : गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना अधिक त्रास होत असतो. मागील अनेक वर्षांपासून हा त्रास असताना देखील प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी आज तलाठी कार्यालयासमोरचा अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार तरवाडी येथे समोर आला आहे. 

बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथील सुमारे २० वर्षांपूर्वी शासनाच्या निधीतून स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. मात्र गावच्या बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे अद्याप पक्का रस्ता तयार करण्यात आलेला नाही. मृतदेह नेताना व्यवस्थितपणे चालता येत नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असतो. रस्त्याचा अभाव असून, या गैरसोयीमुळे ग्रामस्थांना मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी इतरत्र पर्याय शोधावे लागत आहेत. 

स्मशानभूमी बांधली पण रस्ता नाही  

तरवाडीतील एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीचा वापर करण्याचा विचार करण्यात आला. मात्र, त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. स्मशानभूमी बांधताना रस्त्याचा कोणताही विचार केला नसल्यामुळे ही सुविधा गेली दोन दशके नुसती नावापुरतीच आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाजवळ मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध व्यक्त केला आहे. 

ग्रामस्थांनी केला निषेध 

अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र काहीच होत नसल्याने आता या शेतकऱ्याचा अंत्यसंस्कार करायचा कुठे? हा प्रश्न ग्रामस्थाना पडला असता त्यांनी प्रशासनाचा निषेध करता तलाठी कार्यालय समोरचा अंत्यसंस्कार करून निषेध केला. आता यानंतर देखील प्रशासन काय पॉल उचलते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gatari Special Thali : गावाकडची स्टाईल, शहरातली मजा! गटारीसाठी ही नॉनव्हेज थाळी हवीच

Sachin Pilgaonkar: राष्ट्रपतींकडून पुरस्कार, नंतर पंडित नेहरूंनी हाक मारली; सचिन पिळगावकरांनी सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

Maharashtra Live News Update : सिडको विभागाचा भोंगळ कारभार उघड

History Of Hello: फोनवर 'हॅलो' आपण का बोलतो? इतिहास ऐकून थक्क व्हाल

Nanded : स्मशानभूमीच्या जागेवरून गावकरी आपापसात भिडले; गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्यास विरोध

SCROLL FOR NEXT