Chanlisgaon News : दरवाजा बंद करण्यास गेली असता घडले दुर्दैवी; घरात एकट्या असलेल्या तरुणीचा मृत्यू

Jalgaon News : सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. यावेळी धनश्री आणि तिचा भाऊ असे दोघेजण घरी होते. भाऊ देखील बाहेर गेला असता धनश्री दरवाजाला कडी लावायला गेली
Chanlisgaon News
Chanlisgaon NewsSaam tv
Published On

चाळीसगाव (जळगाव) : घरातील सर्व सदस्य कामाला गेले होते. यावेळी घरी बहीण आणि भाऊच होते. यातच भाऊ घराबाहेर गेल्याने तरुणी घरी एकटीच होती. यामुळे ती घराचा दरवाजा बंद करण्यासाठी गेली असता तिच्यासोबत दुर्दैवी घटना घडली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून कामावरून घरी आलेल्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असनू या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील हातले तांडा येथील धनश्री साईनाथ राठोड (वय १७) असे मयत तरुणीचे नाव आहे. धनश्रीचे वडील साईनाथ काशिनाथ राठोड हे हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. तिला दोन भाऊ आहेत. दरम्यान २५ जूनला सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. यावेळी धनश्री आणि तिचा भाऊ असे दोघेजण घरी होते. थोड्या वेळाने तिचा भाऊ देखील बाहेर गेला असता धनश्री दरवाजाला कडी लावायला गेली. 

Chanlisgaon News
Murbad Crime : घरात घुसत शस्त्राचा धाक दाखवून दागिने लुटले; दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दरवाजा बंद करताना बसला विजेचा झटका 

दरवाजाची कडी लावत असताना दरवाजात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने तिला जोरदार झटका बसला. यात धनश्री दूरवर फेकली गेली. दरम्यान, मीटरची वायर कट झाल्यामुळे हा विद्युत प्रवाह उतरला होता अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घरी आले. यानंतर त्यांनी धनश्रीला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. 

Chanlisgaon News
Manpada Police : हाय प्रोफाईल इमारतीत सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांची छापा टाकत कारवाई, तिघेजण ताब्यात

दोन भावांची लाडाची बहीण 

धनश्री हि दोन भावांची एकटीच बहीण होती. तिच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. हात मजुरी करणाऱ्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद घटनेमुळे हातले तांडा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com