Buldhana : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा!
Buldhana : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा! संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा!

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : गेल्या दोन महिन्यापासून नैसर्गिक आपत्ती ने शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाला आहे. मात्र आता सुलतानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची. सरकार फक्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहे.

हे देखील पहा :

मात्र, आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित ठेवत आहे. याची आठवण देण्यासाठी हजारो शेतकऱयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य संताप मोर्चा काढण्यात आला.

बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत, चालू वर्षांचा 100 टक्के पीकविमा मंजूर करा व शेतकऱयांचे चालू वर्षासह संपूर्ण कर्ज माफ करा या मागण्या घेऊन स्वाभिमानी शवंतकरी संघटनेने भव्य मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले. जर येत्या काळात शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT