मेहकरमध्ये ACBची मोठी कारवाई
महसूल अधिकारी २० हजारांची लाच घेताना पकडला
तक्रारदाराच्या माहितीवरून सापळा रचला
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तपास सुरू
संजय जाधव, बुलढाणा
Buldhana Revenue Officer Kailash Bhagwan Murkute Caught Red Handed Taken Bribe बुलढाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम यांच्या पथकाने मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मोठी कारवाई केली आहे. सहाय्यक महसूल अधिकारी कैलास भगवान मुरकुटे यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी तक्रारदाराच्या जमिनीच्या फेरफार प्रकरणातील आदेशाची प्रत देण्यासाठी लाच घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी ACBने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास भगवान मुरकुटे हे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून मेहकर कार्यरत होते. तक्रारदाराच्या नातेवाईकाच्या जमिनीवरील फेरफार रद्द करण्याच्या कामासाठी त्यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी वाशीमकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या माहितीनुसार एसीबीने महसूल अधिकाऱ्या विरोधात सापळा रचला.
ठरलेल्या प्लॅननुसार ACB च्या पथकाने १६ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील मुरकुटे यांच्या कक्षात धाड टाकली. यादरम्यान कैलास भगवान मुरकुटे हे तक्रारदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारताना आढळले आणि एसीबीच्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी २४ जुलै रोजीच कर्मचाऱ्यांना नागरिकांशी सौजन्याने वागावे, कोणतीही अडवणूक करू नये तसेच कोणत्याही कामासाठी लाच किंवा मौल्यवान वस्तू स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश देणारे परिपत्रक काढले होते. या पार्श्वभूमीवर घडलेली ही कारवाई विशेष लक्षवेधी ठरत आहे. तसेच एसीबीकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असल्यास तत्काळ संबंधित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.