Sanjay Gaikwad supporters death threat allegation in Buldhana saam tv
महाराष्ट्र

CM फडणवीसांच्या सचिवांचे बॅनर अन् शिंदेंच्या आमदारांचे कार्यकर्ते संतापले; शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी

Sanjay Gaikwad Supporters Death Threat Allegation In Buldhana: बुलढाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून वाद निर्माण झाला असून आमदार संजय गायकवाड समर्थकांवर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अंतर्गत वाद दिसत असून मित्र पक्षातील नेतेच एकमेकांवर टीका करत असल्याचे दिसून येत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील राजकीय कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाहीये. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यात मतदारसंघात पक्षविस्तार आणि पक्षप्रवेशावरून वारंवार खटके उडत असल्याचे चित्र आहे.

आता या राजकीय वादात आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडल्याने महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या १ सप्टेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात कट आउटस आणि बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरबाजीवरून आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी वाद घालून अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भाजपचे बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक विकी आव्हाड यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण आणि शक्तिप्रदर्शन सर्वसामान्यांसाठी चर्चेचे विषय ठरत आहेत. आता हे प्रकरण पोलीस कारवाईपर्यंत पोहोचल्यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेते, म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लक्ष घालून वाद शमवणार, की बुलढाण्यातील हा राजकीय वाद आणखी विकोपाला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-मुंबई महामार्गावरील कारला फाटा येथे चक्का जाम आंदोलन

Ajwain Water Benefits : रोज २१ दिवस रात्री ओव्याचे पाणी प्या आणि शरीरात होणारा चमत्कार पाहा

Weekly Horoscope: या आठवड्यात कोणत्या राशींचे रखडलेले काम मार्गी लागणार? १२ राशींचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या

भाजपच्या दिग्गज नेत्याने संपवलं जीवन; मृतदेहाला पक्षाच्या झेंड्यात लपेटून अंत्यविधी, राजकारणात मोठी खळबळ

Investment Plan : PPF की सुकन्या समृद्धी? ₹5,000च्या गुंतवणुकीचा असा आहे संपूर्ण हिशोब, फरक पाहून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT