Buldhana Police Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Police : बुलढाण्यात लाखोंचा गुटखा जप्त; एलसीबीच्या टीम कडून एकाला अटक

Buldhana Khamgaon News : खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे पथकाने सापळा रचून संशयित वाहन तपासण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनातून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला

संजय जाधव

बुलढाणा : बंदी असताना गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री करण्यास बंदी असताना देखील गुटख्याची अवैधपणे वाहतूक केली जात आहे. बुलढाण्यात अशाच प्रकारे गुटखा वाहतूक केली जात असताना एलसीबीच्या टीमने कारवाई केली आहे. या कारवाईत २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून एक जणाला ताब्यात घेतले आहे.

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांना गुप्त माहितीच्या आधारे खामगाव परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथक आणि अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग यांचे पथक तयार करून सापळा रचण्यात आला होता.  

५० लाखांचा मुद्देमाल जप्त 

खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे पथकाने सापळा रचून संशयित वाहन तपासण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. यात सुमारे २५ लाख रुपयांचा गुटखा आढळून आले. दरम्यान पथकाने वाहनासह ५० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. 

युवकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल 

स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत 25 लाख 35 हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. तर या प्रकरणी रामराज दुल्हारे (रा. फतेपुर, उत्तरप्रदेश) या युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT