संजय जाधव, बुलढाणा|ता. ८ जुलै २०२४
बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून नदी, नाल्यांना पुर आला आहे. या पावसात एका नदीला पूर आल्याने एक चार चाकी इन्होवा वाहून गेली. सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात रविवार पासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या पावसात नदीला पूर आल्याने एक चार चाकी इन्होवा वाहून गेली. सुदैवाने या वाहनात कुणी बसलेले नव्हते.
खामगाव तालुक्यातील खामगाव - नांदुरा रोडवरील सुटाळा गावातील गावातून जाणारी छोटी नदी खळखळायला लागली. या नदीने कडेला उभी असलेली एक चार चाकी इन्होवा कार अक्षरशः डोळ्यादेखत वाहून नेली. नशीबच म्हणावे लागेल की या वाहनात कोणी बसलेले नव्हते नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की, लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील त्या चार चाकी वाहनाच्या बरोबर वाहून गेले आहे.
दरम्यान, खामगाव तालुक्यातील गारडगावाला नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या पुरात दोन जण अडकल्याचे समजताच आमदार आकाश फुंडकर यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापण विभागाला सूचना दिल्या व त्या बापलेकाना काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोक लँड च्या सहायाने त्यांना बाहेर काढण्यात आले. गारडगाव व गावठाण या दोन्ही गावांमधून वाहणाऱ्या पूर आल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.