Corona
Corona saam tv
महाराष्ट्र

Buldhana जिल्हा मिनी लॉकडाऊनच्या दिशेने, रविवारचा आठवडी बाजार बंद!

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. काल पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आज रविवारचा साप्ताहिक आठवडी बाजार (Market) बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे. दुसऱ्या लाटे नंतर आता पुन्हा जिल्हा लोकडाऊन च्या मार्गावर जाताना दिसत आहे.

हे देखील पहा :

रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे शहरात पुन्हा कोरोनाचा (Corona) धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरातील रविवारचा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा अधिकारी बुलढाणा (Buldhana) यांच्या आदेशान्वये पुढील आदेशापर्यंत रविवारचा आठवडी बाजार बंद राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासन कितीही सांगत असले की कोरोनाचे नियम पाळा, पण राजकीय नेत्यांना याच सोयर सुतक नसल्याचं दिसून येतंय आज बुलढाण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण करताना बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः ही मास्क न लावता कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी मोठी गर्दी बघायला मिळाली शिवाय गर्दीतील कुणीही मास्क लावलेलं नव्हतं.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Van Hits Children : ट्रकने २९ मुलांना चिरडले, १८ जण गंभीर; कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना

Abhijeet Patil: माढ्यात माेठ्या राजकीय घडमाेडी, विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; अभिजीत पाटील करणार भाजपला मदत, Video

Freedom At Midnight Cast Unveiled : निखिल अडवाणी यांच्या 'फ्रिडम ॲट मिडनाइट'चा फर्स्ट लूक आऊट; गांधी- नेहरू आणि पटेल यांच्या भूमिकेत कोण दिसणार ?

Covaxin : कोव्हिशिल्डनंतर आता कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Sanjay Raut: सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

SCROLL FOR NEXT