Buldhana, Gram Panchayat Election Results 2022, Gram Panchayat Election Result
Buldhana, Gram Panchayat Election Results 2022, Gram Panchayat Election Result saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result 2022 : काॅंग्रेस, भाजपास धक्का; बुलढाण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघड्यांची सरशी

संजय जाधव

बुलडाणा : बुलडाणा येथे गुरुवारी झालेल्या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज (शुक्रवार) जाहीर झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलला दोन, भाजपाला एक तसेच स्थानिक पॅनलला दोन ग्रामपंचायतींवर (grampanchayat) विजय मिळाला आहे. (Gram Panchayat Election Result 2022)

आज लागलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल हा मलकापूरात काँग्रेसचे आमदार राजेश एकडे व खामगावच्या भाजप आमदार आकाश फुंडकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. खामगावचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी खामगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीत आपलं पॅनल उभं केलं असताना त्यांना फक्त एकाच ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे. मात्र स्थानिक आघाड्यानी जिल्ह्यातील पाच पैकी दोन ग्रामपंचायतीत विजय मिळविल्याने आता या ठिकाणी सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतचे निकाल

खामगाव तालुका

खामगाव ग्रामीण - भाजपा पॅनल विजयी (एकूण सात जागा - भाजपा 05 , काँग्रेस 02)

पिंप्री धनगर - काँग्रेस पॅनल विजयी (एकूण सात जागा - काँग्रेस 06 , अपक्ष 01)

मलकापूर तालुका

उमाळी - काँग्रेस विजयी (एकूण 11 जागा, काँग्रेस 7, स्थानिक पॅनल 4)

बेलाड - स्थानिक पॅनल विजयी (एकूण जागा - 08 )

आळंद - स्थानिक पॅनल विजयी.

पक्षनिहाय निकाल

शिवसेना 00

ठाकरे गट. 00

शिंदे गट 00

भाजप 01

काॅंग्रेस 02

राष्ट्रवादी 00

मनसे 00

इतर 02

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravindra Dhangekar | Viral Video वर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया!

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Today's Marathi News Live : साखर कारखान्याचा १०००० कोटींचा आयकर माफ केला, देवेंद्र फडणवीस

Mumbra News : मुंब्रा परिसरात एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT