Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा जळून कोळसा; दैवबलवत्तर म्हणून 'समृद्धी'सारखी दुर्घटना टळली

Madhya Pradesh Fire Incident: मध्यप्रदेश येथील शिवपुरीजवळ बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांची लक्झरी बस जळाली. बसचा जळून कोळसा झाला आहे.

Rohini Gudaghe

संजय जाधव बुलढाणा, साम टीव्ही

मध्यप्रदेश येथील शिवपुरीजवळ बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांची लक्झरी बस जळाल्याची घटना घडली आहे. बुलढाण्यातील ६० भाविक चारधाम यात्रेसाठी निघाले होते. तेव्हा त्यांच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत बसचा जळून कोळसा झाला आहे. परंतु सुदैवाने चारधाम यात्रेसाठी निघालेले सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळतेय.

बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील धामणगाव बढे (Buldhana News) येथून चारधाम यात्रेसाठी ६० भाविक निघाले होते. ते दोन बसमधून प्रवास करत होते. तेव्हा १७ मे रोजी दुपारी भाविकांच्या दोन बसपैकी एका बसला आग लागली. दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस जवळ ही घटना घडली आहे.

दरम्यान समय सुचकता राखत सर्व भाविक बसमधून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी बचावले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ‘समृद्धी’ महामार्गावरील गतवर्षीच्या अपघाताची मध्यप्रदेशमध्ये होणारी पुनर्रावृत्ती टळली (Fire Incident) आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातून २ खासगी बसद्वारे ६० भाविक केदारनाथ यात्रेसाठी १५ मे रोजी निघाले होते.

एका बसमध्ये धामणगाव बढे येथील तर आग लागलेल्या बसमध्ये बुलढाणा येथील भाविक होते. मध्यप्रदेशातील शिवपुरी ते गुणा या फोरलेन महामार्गावरील कोलारस पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Madhya Pradesh Fire Incident) बैरसिया क्रॉसिंगनजीक बसमधून धुर निघत असल्याचे निदर्शनास आलं. त्यामुळे चालकाने बस थांबवली आणि सर्व भाविकांना सुखरूप खाली उतरवलं.

बसमधील ३० भाविक सुखरुपपणे उतरण्यात यशस्वी झाल्याचं भाविकांपैकी एकाचे नातेवाईक असलेल्या उल्लास बढे पाटील यांनी सांगितलं आहे. या बसमध्ये १८ महिला आणि १२ पुरुषांचा समावेश (Devotees Bus Got Burnt) होता. दरम्यान बसने चांगलीच आग पकडली होती. कोलारस पालिकेच्या अग्निश्यामक दलाने नंतर ही आग विझवली. परंतू बस पुर्णत:जळून खाक झाली आहे. बसच्या एसीमध्ये शॉर्टसर्कीट होऊन ही आग लागल्याची चर्चा यात्रेकरूंपैकी एकाने बोलून दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT