Police investigate a triple tragedy reported from Buldhana's Savargaon Dukre village. Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Buldhana Son Allegedly Kills Parents: बुलढाणा येथे एका मुलाने कुऱ्हाडीने वार करत आईवडिलांची हत्या केली आहे. आईवडिलांची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केलाय.

Bharat Jadhav

  • बुलढाणा जिल्ह्यात एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय.

  • मुलानेच आई-वडिलांची हत्या केली.

  • हल्ल्यानंतर आरोपी मुलाने आत्महत्या केली आहे.

चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात एक धक्कादायक घटना घडलीय. एका मुलाने कुऱ्हाडीने वार करत आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर स्वता:ने आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. ही भीषण घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय चिखली येथे पाठवले. मात्र मुलानं असं कृत्य केलं याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास कर आहेत. शेजाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव डुकरे येथील ४२ वर्षीय विशाल सुभाष डुकरे या व्यक्तीने सकाळच्या सुमारास आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. यात वडील सुभाष डुकरे (वय ७५) आणि आई लता डुकरे (वय ६५ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. आई-वडिलांची हत्या केल्यानंतर विशाल डुकरेने स्वतःला गळफास लावत जीव दिला.

या घटनेनंतर सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान फॉरेन्सिक तपासणी आणि मृतदेहांच्या पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच हत्येमागचं खरं कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी रायगडमधेही अशीच घटना घडली होती. म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावातील दोन मुलांनीच आपल्या वृद्ध आई-वडिलांची घटना घडलीय.आईवडील आपल्याला घरखर्च देत नाहीत. घरात राहू देत नाहीत याच्या रागातून दोन्ही मुलांनी आई-वडिलाचा खून केला. मृतांची नावे महादेव कांबळे (वय ७०) आणि विठाबाई कांबळे (वय ६५) अशी होती. दोघांचे मृतदेह दोन दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT