Buldhana Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : महिला सरपंचासोबत १५ जणांचं संतापजनक कृत्य; बुलडाण्याला हादरवून टाकणारी घटना

एका महिला सरपंचाच्या घरात तब्बल १५ जणांनी जबरदस्तीने प्रवेश करत तिला बेदम मारहाण केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Buldhana Crime News : राज्यात महिला अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. एकीकडे महिलांवरील अत्याचाराविरोधात कडक पाऊलं उचलण्याची मागणी होत असताना दुसरीकडे बुलडाण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका महिला सरपंचाच्या घरात तब्बल १५ जणांनी जबरदस्तीने प्रवेश करत तिला बेदम मारहाण केली आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव गावात ही संतापजनक घटना (Crime News) घडली आहे. रमाबाई जाधव असे या जखमी झालेल्या महिला सरपंचाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२२ डिसेंबर) १५ जणांनी अचानक रमाबाई जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली.

तू फुकट सरपंच झाली, असं म्हणत आरोपींनी महिला सरपंचासह तिच्या मुलावरही हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही किरकोळ जखम झाली आहे. या घटनेनंतर महिला सरपंचाने थेट जानेफळ (Buldhana) पोलीस ठाणे गाठले पण तिथे त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. पण तिथूनही या महिला सरपंचाला परत पाठवण्यात आले.

दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर सरपंच रमाबाई जाधव या बराच वेळ जानेफळ पोलीस स्टेशनला ताटकळत बसल्या होत्या. तरीही मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे त्या हतबल झाल्या. त्यांना झालेल्या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर असूनही पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT