Buldhana Murder Case Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : संशयाचं भूत राहुलच्या डोक्यात शिरलं, गाढ झोपलेल्या बायको अन् मुलाची कुऱ्हाडीने हत्या, दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

Buldhana Murder Case : बुलढाणामध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नी आणि ४ वर्षांच्या मुलाची कुऱ्हाडीने हत्या केली. या घटनेने शहर हादरले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये चारित्र्याच्या संशयातून दुहेरी हत्या

  • पत्नी रूपाली आणि ४ वर्षांचा मुलगा रियांश यांचा कुऱ्हाडीच्या हल्ल्यात मृत्यू

  • आरोपी पती राहुल म्हस्के पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल

  • शिक्षक कॉलनीतील घटनेने शहरात हळहळ, तपास सुरू

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी, वार्ड नं १ येथे रात्री एक धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी व चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली असून, यामुळे संपूर्ण मेहकर शहर हादरून गेले आहे.

या घटनेत पत्नी रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी पतीचे नाव राहुल हरी म्हस्के (वय ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना आरोपीने पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना जालना परिसरात त्यांचा मृत्यू झाला आहे.

राहुल म्हस्के यांच्यासह त्यांचे आई-वडील व आजी असे एकूण सहा जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

मेहकर पोलिसांनी आरोपी राहुल म्हस्के याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण, संशयाची पार्श्वभूमी आणि आरोपीची मानसिक स्थिती याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार वर्षांच्या निष्पाप रियांशच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, घरगुती संशय आणि मानसिक अस्थैर्याचे भीषण वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Hair Care : केसांना लावलेली मेहंदी लवकर फिक्की पडते? मग काय करावे जाणून घ्या

BJP : भाजपच्या निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये राडा, नाराजांना हटवण्यासाठी पोलीस दाखल, पाहा व्हिडिओ

Nikhil Gaikwad : 'काम करण्याचे फळ मिळाले...' उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेता नाराज, पदाचा राजीनामा दिला अन्...

China Video: चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा न करता तरुणाने वाचवलं| VIDEO

SCROLL FOR NEXT