महाराष्ट्र

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर काढला; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Father Kills Twin Daughters Buldhana Crime: पत्नीशी वाद झाल्यानंतर एका व्यक्तीने जुळ्या मुलींची हत्या केल्याचा आरोप आहे. अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

Bharat Jadhav

  • जंगलात दोन्ही चिमुकल्या मुलींचे कुजलेले मृतदेही आढळले.

  • आरोपी राहुल चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

  • अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना घडलीय

संजय जाधव, साम प्रतिनिधी

नवरा-बायकोचे नाते नाजुक धाग्याने बनलेले असते. या नात्याला वादाच ग्रहण लागलं तर तर सुखी संसाराची राखरांगोळी होते. बुलढाण्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीशी झालेल्या वादाचा नराधम बापानं जुळ्या मुलींवर काढला. पत्नीवर आलेल्या रागातून त्याने दोन मुलींचा जीव घेत त्यांच्या मृतदेह जंगलात पुरला. संतपाजनक घटना बुलढाणामधील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

मानवतेलाही काळिमा फासणारी घटना जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे. राहुल चव्हाण असे आरोपी वडिलांचे नाव आहे. राहुल चव्हाण हा रुई (जि.वाशिम) येथील रहिवासी आहे. तो पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. राहुल चव्हाणने आपल्या दोन जुळ्या अडीच वर्षीय चिमुकल्या मुलींचा गळा चिरून निर्दयपणे खून केला.

राहुल आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह घरी जात होता. त्यावेळी राहुलचा बायकोशी वाद झाला. संतापाच्या भरात पत्नी माहेरी जाण्यास निघाली. तर रागाच्या भरात राहुलने आपल्या दोन निरपराध मुलींना घेऊन अंढेरा फाटा परिसरातील अंचरवाडी शिवारातील जंगल गाठले. तिथे त्याने दोन्ही जुळ्या मुलींचा गळा चिरून त्यांचा जीव घेतला. यानंतर, या नराधमाने स्वतः वाशिम पोलीस ठाण्यात जाऊन थेट गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. डीवायएसपी मनिषा कदम पोलीस निरीक्षक शंकर शक्करगे, अधिकारी संतोष खराडे, जाधव, जारवार, फुसे आदी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या अमानुष घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे.एका वादातून दोन कोवळ्या जीवांचा अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पित्याच्या हातून चिमुकल्या मुलींचा खून झाल्याची ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असून, अशा विकृत मानसिकतेविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT