Buldhana bus Accident: Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: बुलढाण्यात भीषण अपघात! खासगी बस १०० फूट दरीत कोसळली; २८ जखमी

Buldhana bus Accident: इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २७ एप्रिल २०२४

बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यामधील जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात खासगी बस १०० फुट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना साडे पाच वाजता हा अपघात झाला.

जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झाले. घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातातील अपघातात २८ जण जखमी झाले असून, सर्व खमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खासगी बसला आग..

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर आढे गावाच्या हद्दीत खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही. बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसचा टायर फुटल्याने बसला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT