Buldhana Bus Accident Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: बुलढाणा बस अपघात! मृतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश; DNA चाचणीनंतर पटणार ओळख

मृतकांची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटची मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा...

Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील झालेल्या भीषण (Buldhana Accident) अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला.

या अपघातात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वर्ध्या जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश असून मृतकांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी पोलिस आणि तहसीलदारसह वर्धेचे पथक बुलढाण्याला रवाना झाले आहे.

वर्ध्यातील १४ जणांचा समावेश...

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात वर्धा जिल्ह्यातील 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी जखमी आहे. या घटनेने वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. नागरिक आपल्या नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत नागरिकांना नातेवाईकांची तात्काळ माहिती मिळावी याकरिता धावपळ सुरु केली.

सकाळी आठ वाजताच वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाची एक टीम घटनास्थळी पोहचली तर तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह इतर पोलिसांचे पथक बुलढाणा येथे पोहचत आहे. मृतकांची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटची मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे.

मृतांची नावे...

या अपघातात अवंती पोहनीकर, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, राधिका खडसे , तेजस पोकळे, तनिष्का तायडे, शोभा वनकर, वृषाली वनकर, ओवी वनकर, तेजस्विनी राऊत, पंकज रमेश्चंद्र, सुशील खेलकर, करण बुधबावरे, राजश्री गांडोळे यांचा मृत्यू झाला असून पंकज रमेश्चंद्र असे जखमी प्रवाशाचे नाव आहे..

दरम्यान, "नातेवाईकांना बुलढाणा सिविल हॉस्पिटलला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करून ठेवली आहे. जे आपल्या जिल्ह्यातील आहेत त्या सगळ्यांची पूर्ण नाव पत्ता त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे नातेवाईक या सर्वांशी संपर्क आम्ही साधलेला आहे. आणि त्यांना या संदर्भात असेल जे सहकार्य प्रशासन सहकारी आम्ही तयार आहोत.." असे जिल्हाधिकारी कर्डीले यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT