Buldhana Bribe News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana: अकरावीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच; चौघांना अटक

विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापकाने पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली होती.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुलढाणा (Buldhana) येथील इयत्ता ११ च्या विज्ञान शाखेत प्रवेश देण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहा हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना मुख्याध्यापकासह चार जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं असून या चौघांना अटक करण्यात आली आहे.

काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सदर कारवाई करण्यात आली आहे मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड, वस्तीगृह कार्यवाहक गजानन सुखदेव मोरे, मजूर जितेंद्र प्रल्हाद हिवाळे आणि लेखापाल राहुल विष्णू जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

विद्यालयामध्ये तक्रारदाराच्या मुलाला अकरावीत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्या वतीने वस्तीगृह कार्यवाहक गजानन मोरे याने पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती दहा हजारात सौदा पक्का केला गेला.

आरोपी जितेंद्र प्रल्हाद हिवाळे याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त केले तर आरोपी लेखापाल राहुल विष्णू जाधव याने मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चारही आरोपींना रंगेहात अटक केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT